सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई :- सिंगापूरचे कॉन्सुल जनरल चेओंग मिंग फूंग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी व्हाईस कॉन्सुल जनरल(राजकीय)झ्याचेस लिम, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यावेळी उपस्थित होते.

गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात जमीन, पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. लॉजीस्ट पार्क,आयटी पार्क, समृद्धी महामार्गालगत औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी, रायगड आणि पालघर क्षेत्रात उद्योगांसाठी जागा आदी विषयांसह सिंगापूर आणि भारतातील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण आर्थिक संबंध वाढविण्याबाबत, अत्याधुनिक नवकल्पना निर्माण करण्याच्यादृष्टीने व्यवसाय आणि भारतातील संभाव्य गुंतवणूक वाढवणे अशा विविध विषयांवर उभयतांमध्ये यावेळी चर्चा करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ

Fri Dec 16 , 2022
थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एअर इंडियाच्या मुंबई ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com