नागपूर :- आदिवासी हलबा समाज विकास संस्थाच्या माध्यमाने श्रीगुरु कोलबास्वामी सांस्कृतिक सभागृहात हलबांचा स्नेह संमेलनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,शाहू महाराज ,बिरसा मुंडा ,महात्मा ज्योतिबा फुले , सावित्री फुले यांचा छायाचित्रास प्रमुख पाहुण्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
हलबांचा स्नेह संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर वाकोडीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विकास कुंभारे ,अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते,जेष्ठ कामगार नेते विश्वनाथ आसई, माजी आयकर आयुक्त धनंजय धार्मिक,कांता पराते,राजन नंदनकर ,ओमप्रकाश पाठराबे ,अभय धकाते हे मंचावर उपस्थित होते . या कार्यक्रमाची प्रस्तावना भास्कर चिचघरे यांनी केली.
हलबांचा स्नेह संमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते म्हणाले की संविधान यादीत हलबा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती म्हणून आहे, या यादीत बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही म्हणून संविधानामुळे हलबांना अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे . भारताचे संविधान हा आमचा आत्मा असल्याने याचे संरक्षण करणे आमचे मूलभूत कर्तव्य आहे. यासाठी एकत्र येणे काळाची गरज ओळखून सर्वांनी त्यासाठी एकत्र यावे.
जेष्ठ कामगार नेते विश्वनाथ आसई यांनी कार्यक्रमात प्रतिपादन केले की देशात गुलामगिरी सुरु करण्याचे षडयंत्र सुरु झाले यापासून सावध राहून आपल्या न्याय हक्कासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे. बीजेपीने १० वर्षात हलबाच्या कोष्टी व्यवसायाची घटना दुरुस्ती संसदेत केली नाही तर बीजेपी हटाव हलबा बचाव हा नारा देण्याची वेळ आली आहे. याप्रसंगी आमदार विकास कुंभारे ,माजी आयकर आयुक्त धनंजय धार्मिक,कांता पराते,राजन नंदनकर ,ओमप्रकाश पाठराबे ,अभय धकाते यांनी हलबा समाज बांधवाना मार्गदर्शन केले.
हलबांचा स्नेह संमेलनाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर बावणे,रवींद्र फणिभरे ,संगिता सोनक, शकुंतला महाजन ,अनिता चिचघरे ,राखी धापोडकर,विजय डोबारकर, लक्ष्मण बावणे, प्रशांत माताघरे ,उमाकांत बारापात्रे ,भरत पेकडे, होमचंद धकाते ,संजय सोनेवाले यांनी अथक परिश्रम केले.