अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाच्या समन्वयक प्रा. अरुणा तसरे होत्या. सर्वप्रथम दिपप्रज्वलन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सामुहिकपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.कार्यक्रमात निबंध लेखन व वाचन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी ऋतुजा ठाकरे, अमृता देशमुख, गणेश मगर, अंकिता वैद्य या विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन संविधानाच्या विविध पैलूंवर निबंध लिहून वाचन केले. ऋतुजा ठाकरे हिच्या ‘संविधानाची मूलभूत तत्वे’ या निबंधाला प्रथम पुरस्कार मिळाला. पुरस्कार म्हणून संविधानाची प्रत भेट देऊन तिचा सत्कार केला.याप्रसंगी विभागातील डॉ. प्रवीणकुमार मोहोड यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रिया वानखडे, तर आभारप्रदर्शन प्रा. भावना गव्हाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. डॉ. वनिता राऊत, प्रा. श्रध्दा हरकंचे, प्रा. शुभम वैद्य, प्रा. भावना गव्हाळे, राजू इंगोले तसेच विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले.
विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात संविधान दिन उत्साहात साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com