– जिल्हाधिकाऱ्यांनी केला रॅलीचा प्रारंभ
नागपूर :- संविधान दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागावतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला व शुभेच्या दिल्या.
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी आशा कवाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर आदी यावेळी उपस्थित होते.
रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर श्रद्धानंदपेठपासून रहाटे कॉलनी, लोकमत चौक, पंचशील चौक, यशवंत स्टेडीयम, व्हेरायटी चौक, झिरो माईल मार्गे संविधान चौक पर्यंत पोहोचल्यावर डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आले. समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.