भंडारा : – भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथील पूर्णकृती पुतळ्याला माल्या अर्पण करत संविधान दिनानिमित्ते पुतळ्याला पुष्पहार संविधान दिन चिरायू हो अश्या घोषणाबाजी केली .
26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारतासाठी अतिशय खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतामध्ये संविधान औपचारिकपणे स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करणे हा आहे. भारताचे संविधान बनवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो.
26 नोव्हेंबर हा दिवस पहिल्यांदा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे कारण म्हणजे 1930 मध्ये काँग्रेस लाहोर परिषदेने पूर्ण स्वराजची प्रतिज्ञा पास केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ कायदा दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
संविधान दिनाच्या निमित्ताने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने हंगामी अध्यक्ष मदन बागडे, संघटक यशवंत नांदेश्वर,अजय मेश्राम, भीमशंकर गजभिये, नंदगवळी सर, देवानंद मिरसे, विलास नागदेव, टेम्भुरने सर, सुनील धारगावे, तसेच अनेकआंबेडकर अनुयायी उपस्थिती होते,