नवी दिल्ली :- महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे ‘संविधान दिन’ आज साजरा करण्यात आला.
कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘संविधान दिन’ साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचा-यांनी ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिकपणे वाचन केले. यावेळी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.