नागपूर :- भारतीय संविधानाच्या इंग्रजी व हिंदी या मूळ प्रति पासून तर 1950 पासून विविध भाषेत निघालेल्या, विविध प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या, विविध प्रकारच्या शासकीय व अशासकीय पन्नासावर आवृत्त्यांची ग्रंथ प्रदर्शनी काल भरवण्यात आली होती. ही ग्रंथ प्रदर्शनी कांशीराम रिसर्च सेंटरचे संचालक उत्तम शेवडे यांनी इंद्रप्रस्थ नगरातील भारतीय बौद्ध परिषदेच्या भव्य पटांगणात झालेल्या बहुजन परिषदेत लावली होती.
या प्रदर्शनीत लोकसभा सचिवालयाच्या वतीने 2009 साली इंग्रजीत प्रकाशित करण्यात आलेल्या कॉन्स्टिट्यूएंट असेंबली डिबेट्स चे अंदाजे सहा हजार पानांचे पाच खंड, 1994 ला हिंदीत प्रकाशित केलेले दहा खंड व राईट थिंकर्स पब्लिकेशन या खाजगी प्रकाशनाने 2013 ला प्रकाशित केलेले मराठीतील दहा खंड ठेवण्यात आले होते.
संविधानावर विविध लेखकांनी लिहिलेली व संपादित केलेली पुस्तके सुद्धा या ग्रंथ प्रदर्शनी ची वैशिष्ट्ये होते. या ग्रंथ प्रदर्शनीला शेकडो लोकांनी भेटी दिल्या संविधान चौकात 26 नोव्हेंबर 2024 रोजी लावण्यात आली होती. या प्रदर्शनीमुळे भारतीय संविधानाचा प्रवास अभ्यासकांना लक्षात येतो. मूळ संविधानावर जवळपास 300 सदस्यांच्या सह्या आहेत. हिंदीच्या खंडात त्यांचा फोटो सुद्धा उपलब्ध आहे.