प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर सामाजिक न्याय विभागाचा “घर घर संविधान” उपक्रम

मुंबई :- भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन 2024-25 पासून “घर घर संविधान” उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत प्रजाकसत्ताक दिनी संविधानाचा जागर होणार आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच दि. 26 जानेवारी 2025 रोजी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व आस्थापनांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक,माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थ सहाय्यित शाळा, आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी ‘घर घर संविधान’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दि. 26 नोव्हेंबर 2024 ( संविधान दिवस) पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे, व्याख्यान, रॅली व संविधान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यातील फळ व फुल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरावी - पणन मंत्री जयकुमार रावल

Thu Jan 23 , 2025
मुंबई :- राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्नेट प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाची व्यापार कौशल्ये वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. आशियाई विकास बँक अर्थसहायित महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (magnet) प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीस आशियाई विकास बँकेचे संचालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!