नागपूर :- 7 नोव्हेंबर लुबिनी बुद्ध विहार मानकापूर येथे महिला आघाडी तर्फे वंदना घेण्यात आली.धर्म, पंथ, जात या सगळ्या पलीकडे एकजुटीने उभा राहणारा महाराष्ट्र, आज आपल्या सर्वांच्या पुढे आणखी एक सोनेरी पर्वणी घेऊन आला आहे. परंतु विरोधी पक्ष फ़ेक नैरेटिव पसरवून खोटा प्रचार करताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर संघभूमी नागपूरमध्ये बुधवारी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन रा. स्व. संघाकडून देशाच्या संविधानावर छुपा हल्ला केल्यामुळे भाजपा महिला आघाडी अध्यक्ष प्रगती पाटील यांनी कडक आवाजात महिला मोर्चा तर्फे असे संबोधित केले की, नागपूरच्या संविधान संमेलन राहुल गांधी यांनी संविधान संमेलन आयोजित करून काँग्रेसने पुन्हा एकदा ढोंग केले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे काँग्रेसने वेळोवेळी उल्लंघन केले आहे. देशाला गृहीत धरून काँग्रेसने सर्वाधिक घटनादुरुस्त्या केल्या आणि संविधान पायदळी तुडवले. घटनेतील कलम 356 चा वापर करून अनेक राज्यांमधील गैर काँग्रेसी सरकारे काँग्रेसच्या केंद्रातील सरकारांनी बडतर्फ केली होती याचे विस्मरण जनतेला झालेले नाही. भाजपाची लोकनिर्वाचित राज्य सरकार बडतर्फ करून काँग्रेसने असंख्य वेळा संविधानाच्या चिंधड्या उडवल्या आहेत, हे काँग्रेसचे मंडळींनी लक्षात ठेवले पाहिजे. 1975 साली देशात आणीबाणी घोषित करून काँग्रेसने नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले होते आणि असंख्य देशभक्त नागरिकांना कोणतेही कारण न सांगता तब्बल 19 महिने तुरुंगात डांबले होते. ही तर डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाची दिवसा उजेडी झालेली हत्या होती. तीच काँग्रेस आज संविधान संमेलन आयोजित करून सोंग करत आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. महिला मोर्चा तर्फे ” भाजप महिला मोर्चा का एक ही नारा संविधान है हमें दिल से प्यारा” तिथे उपस्थितीत असंख्य महिलांनी नारा देत राहुल गांधी विरोधी आपला क्रोध दर्शवीला.
या मोर्च्यात वैशाली कोहळे, शीला चक्रे,कविता सरदार,सिबरन कौर,नेहा मोतीयांनी, श्वेता ठाकूर, रेखा दैणे, राखी शिंगारे, राजेश्री बिस्वास,रजनी पांडे राणी रेड्डी, शुभांगी मेंघअळ, सुनंदा सातपुते, भावना रेड्डी, कविता कांबळे, सुशीला गुप्ता, मालती रापत्तीवार , छाया रापत्तीवार, शोभा पाटील, सोनू वानखेडे. हिंदू रोंगडे. शितल सोनेकर, शीला जोडापे, शालू पाटील मंगला मेश्राम, मुमताज अहमद, लता डीकोनवार, निर्मला डीकोणवार, राणू यादव, सीता कनोजे, विमला शर्मा, नम्रता कन्हेरे, अंजली डीकोनवार, कल्याणी व्याज, पूजा नंदेश्वर. वैशाली मेहेर. सत्यवती चव्हाण, सीमा धोंगडे. शितल धोंगडे. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.