संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 – चॅलेंजर मार्शल आर्ट असोसिएशन उतगपूर या संस्थेद्वारे स्व. सौ. सिमा विनोद चलपे व स्वर्गीय नितीन रायबोले गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ८ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी रनाळा येथील सुभाष क्रीडा मंडळ पटांगणात तायकांडो प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 13 नोव्हेंबर रविवारला आयोजित करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर फोर्स च्या कराटे प्रशिक्षिका संतोषी धुर्वे यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शनाकरिता उपस्थित कुमार कुमारिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की वर्तमान काळात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी व स्वयंरक्षण साठी आत्मनिर्भर राहण्यासाठी तायकोंडो व कराटे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक जीवन बाब असल्याचे व्यक्त केले याप्रसंगी किमान 100 कुमार कुमार कुमारीनी प्रशिक्षण घेतले याप्रसंगी. . प्रामुख्याने भूषण चापले विलास नाकाडे विनोद चलपे सेवानिवृत्त सैनिक शेषराव आढाऊ नम्रता आढाऊ अरुण जुमडे सचिन दुधाने संतोष चलपे माजी सरपंच देवराव आम् धरे सामाजिक कार्यकर्ते पंकज साबळे स्वप्निल फुकटे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर गिरी रश्मी मेंढे वर्षा गुजरकर दीपा दुधाने मंगला चलपे पिंकी शेळके मंदा आढाऊ मनीषा गिरी शुभांगी मुलमुले तसेच सुभाष क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू व गावातील विद्यार्थी व ग्रामोसी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परागसपाटे यांनी केले आभार प्रदर्शन विनोद चलपे यांनी केले