शेतात पडून मृत झालेल्या सुरेशच्या घरी जाऊन उपसभापतीसह अधिका-यांची सांत्वन भेट

अमरदिप बडगे , प्रतिनिधी 

तिरोडा – तालुक्यातील बाघोली येथील सुरेश छगन वानखेडे यांचे दोन दिवसा अगोदर शेतात रोहिणी चे काम सुरू असतानाच शेतात च मुत्यदेह दिसुन आलेला होता.सुरेश वानखेडे यांच्या परीवाराला शासकीय योजना चा लाभ व सांत्वन करण्यासाठी तिरोडा पंचायत समिती चे उपसभापती हुपराज जमईवार यांनी कृषी विभागाचे अधिकारी जितेंद्र बावनकुळे ,महिला बाल प्रक्लप अधिकारी विनोद चौधरी, यांच्या सह कुंटुबाची विचारपूस करून घटनेची माहिती जाणुन घेऊन त्यांना कृषी विभागाकडून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना चा लाभ देण्यात येईल.तसेच महिला बाल कल्याण योजना अंतर्गत बाल संरक्षण योजनेचा लाभ लहान दिड वर्षीच्या मुलींना व पत्नी ला संजय गांधी निराधार योजना सह कुंटुब आर्थिक साहाय्य योजना चा लाभ देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. कुंटुबाना प्रस्ताव सादर करण्यासाठी अर्ज देण्यात आले.मृतक शेतकऱ्यांच्या कुंटुबात पत्नी असुन तेही मुकबधीर आहे. आई म्हातारी, दिड वर्षाची चिमुकली असुन परीस्थिती हलाकीची आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

इच्छुकांचे आता 28 जुलै च्या नवीन आरक्षण सोडतीकडे वेधले लक्ष

Sat Jul 23 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -कामठी नगर परिषद निवडणुकीचे गणित बदलणार! – ओबीसी आरक्षणामुळे निघणार नव्याने सोडत कामठी ता प्र 23 :- आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणा विनाच होणार असल्याचे गृहीत धरून तसे आरक्षण सोडतिचा कार्यक्रम आटोपुन झाला असून निवडणुका लागण्याच्या तोंडावर असतानाच आता 20 जुलै ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षण लागू झाल्याने आता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com