संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नुकत्याच 19 व 20 जुलै ला कामठी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले तसेच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले तसेच शेती पाण्याखाली आल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा तेव्हा शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई तसेच खावटी लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी कामठी तालुका शहर तसेच ग्रामीण कांग्रेस कमिटीच्या संघटन च्या वतीने करण्यात आली तसेच या,नुकसानभरपाई पासून कुणीही लाभार्थी वंचीत राहू नये याची दक्षता घ्या अन्यथा प्रशासना विरोधात कांग्रेस तर्फे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा ईशारा सुद्धा कांग्रेस तर्फे तहसीलदार गणेश जगदाळे यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देताना शिष्टमंडळात नगर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष रमेश दुबे, नागपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे महासचिव व माजी नगराध्यक्ष शकूर नागानी, जिला परिषद सदस्य नाना कँभाले, मनोज शर्मा, नगर कांग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण संगेवार ,आसिफ सिरमितिया, मोहम्मद अरशद, सुर्रया बानो, मोहम्मद शाकिब, रितेश यादव, किशोर धांडे, मोहसिन अख्तर, साजिद कमाल, अमीन रशीद, अभिषेक चिमंकर, धीरज यादव, मोहम्मद शफीक, मोहन कुरेशी, कुनाल इतकलवार, सोमेश जेटली, आरिफ मीर अली, तौसीफ फैजी, रशीद अंसारी, फैजल नागानी, संदीप जैन, मीनाक्षी गजभिए, हसीना बानो, लक्ष्मी ताई, शामिन साई, धमगाये, नसीम खान, मोनू, रुकसाना बानो,आदी उपस्थित होते.