चुकीच्या धोरणामुळे कॉंग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला – हेमंत पाटील

मुंबई :- चुकीच्या राजकीय, संघटनात्मक धोरणामुळे कॉंग्रेसने पुन्हा एकदा एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक रिंगणात उभे असलेले पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसने समर्थन द्यावे,असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत कॉंग्रेसने दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा आत्मघातकी आहे. अशा नाजुक वेळी पक्षाची पडझड रोखण्यासाठी दृरदृष्टिने निर्णय घेत कॉंग्रेसने सत्यजीत यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.

अखेरच्या क्षणी भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेत सत्यजीत यांच्या सर्वपक्षीय पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.सत्यजीत यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या पावलावर पावूल ठेवत सामाजिक, राजकीय धडे गिरवले. राजकीय भविष्याची चिंता सतावत असल्याने कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांच्या वडिलांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली होती,असा दावा देखील पाटील यांनी केला आहे.सत्यजीत तांबे हे हेमंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत, हे विशेष. भाजप तसेच संघावर टीका करणारे, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय तरूण नेतृत्व सत्यजीत यांनी भाजप तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठिंबा का मागीतला? याचे चिंतन कॉग्रेसने करीत अंतर्गत गटबाजी संपवण्याच्या दिशेने पावले टाकण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेपक टॅकरामध्ये श्री नक्षत्र आणि डब्ल्यू वॉरिअर्सला विजेतेपद , खासदार क्रीडा महोत्सव 

Sat Jan 14 , 2023
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सेपक टॅकरा स्पर्धेचे महिलांमध्ये श्री नक्षत्र स्पोर्ट्स क्लब आणि पुरुषांमध्ये डब्ल्यू वॉरिअर्स संघाने विजेतेपद पटकावले. शुक्रवारी (ता.13) सायंकाळच्या सत्रात नरेंद्र नगर येथील लक्षवेध मैदानात स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. महिला गटात नक्षत्र स्पोर्ट्स क्लब संघाने डिव्हाईन एलेमेंट्स संघाचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. विजेत्या संघाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com