संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्व समाजातील सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त करून दिला असताना 36 इंच छाती असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, शेतमजूर,सर्वसामान्य नागरिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात जीएसटी कर आकारणी करून देशाचे सर्वात मोठे उद्योगपती अंबानी यांना जीएसटी कर् माफ करून समाजातील तरुण सर्वसामान्य नागरिकाच्या आशेवर पाणी फेरले असून नरेंद्र मोदी सरकारने नोटबंदी आणून संविधानाचा अपमान केला आहे अशा विविध पोकळ आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकार पासून सावध राहणे आजची गरज आहे तर देशातील विविध समाजातील सर्व नागरिकांना घेऊन चालणारा एकमेव काँग्रेस पक्ष असल्याचे मौलिक मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने कामठी बी बी कॉलोनी स्थित मवेशी क्रीडांगणावर आयोजित ईद मिलन सोहळ्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नफरत छोडो – भारत जोडो ईद मिलन कोमी एकता सोहळ्याची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा ,प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे ,किशोर गजभिये, बाबुराव तिडके,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकुमचंद आमधरे, माजी आमदार एस क्यु जामा ,माजी नगराध्यक्ष मोहम्मद शहाजहा शफाअत अन्सारी, मोहम्मद हसन अली, रतनलाल बरबटे ,समाजवादी पार्टीचे परवेज सिद्दिकी, शिवसेनेचे राधेश्याम हटवार ,मुकेश यादव ,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोहेब आसद ,डॉक्टर नौशाद सिद्दिकी वंचित बहुजन आघाडी चे प्रमोद उर्फ दादा कांबळे,कार्यक्रमाचे आयोजक माजी नगराध्यक्ष शकूर नागांनी ,प्रसन्न राजा तिडके, जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले , नगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृष्णा यादव ,अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आबीद ताजी ,माजी नगरपरिषद उपाध्यक्ष मतीन खान, अहफाज अहमद,मनोज यादव ,मोहम्मद आशिक , तुषार दावांनी, प्रमोद गेडाम, उबेद अफरोज, अभिषेक चिमणकर,मोहसीन,प्रमोद खोब्रागडे, उपस्थित होते.दरम्यान उपस्थित पाहुण्यांचे हस्ते विविध धर्मगुरू राज योगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता,ग्याणीजी हरपित सिंग ,भंते नागदीपंकर, मौलाना अन्सार अली हिंदी ,सह विविध धर्मगुरूचे शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नाना गावंडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार डॉ वजहत मिर्झा, हुकूमचंद आंमधरे ,यांनी ईद मिलन सोहळ्यात मार्गदर्शन करताना म्हणाले आज देशात विविध राजकीय पक्षाकडून विविध जाती धर्माच्या नागरिकांमध्ये विषमता, असामाजिकता निर्माण करण्याचे कार्य सुरू असून त्यापासून नागरिकांनी सावध राहावे, समाजातील विविध जाती धर्माच्या नागरिकांना एकतेच्या सूत्रात घेऊन चालणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष हाजी मो शकूर नागांनी यांनी केले,संचालन मोनीस आक्तर यांनी केले आभार प्रदर्शन प्रसन्न राजा तिडके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कंभाले, सुलेमान अब्बास, संजय मेश्राम, फारूक कुरेशी, ओमेद आप्रोज, अजमल लूत, हर्षद खडसे, हारून नागानी, सूरया बानो, ममता कांबळे ,राजू बेलेकर ,हरून अन्सारी ,आलिया तबसमुन ,आमिन रशीद ,प्रमोद खोब्रागडेे, अभिजीत सिरीया ,सुशांत यादव ,सोहेल अंजू ,अक्रम नाझीम कुरेशी,माधुरी गजभिये ,मोहसीन अख्तर, पप्पू चिमणकर, हैफिज कुरेशी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.
-ईद मिलन व कौमी एकता समारोहात बहुतांश कांग्रेस नेत्यांची दांडी
– महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या वतीने काल 28 एप्रिल ला आयोजित ईद मिलन व कौमी एकता समारोहात कांग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यामुळे कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना या समारोहात कांग्रेस नेत्यांची फौज उपस्थित राहणार असे अपेक्षीत होते मात्र बोटावर मोजणारे कांग्रेस पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकदम कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात रात्री पावणे दहा वाजता पोहोचले तर निमंत्रित असलेल्या दिग्गज नेत्यामधील कांग्रेसचे माजी मंत्री व आमदार सुनील केदार,माजी पालकमंत्री नितीन राऊत,कांग्रेस चे नागपूर ग्रा जिल्हा अध्यक्ष माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आदींची अनुपस्थिती ही कार्यक्रमात दांडी मारलेले ठरले. आणि कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असलेले ‘नफरत छोडो -भारत जोडो’ या संकल्पनेतुन स्थानिक नेत्याला निमंत्रण न देणे व अनुपस्थित नेत्यांची मंदियाळी ही कार्यक्रमाच्या नाराजगीचा पुरावा देत असून कांग्रेसची आपसातील नफरत व गटबाजी चव्हाट्यावर दिसुन आल्याने एकच चर्चेचा विषय ठरला तर आयोजित समारोह कार्यक्रम यशस्वी ठरला असला तरी स्थानिक बहुतांश कांग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरला.