भारतीय नौदलात फायटर पायलट म्हणून निवड झालेल्या सिद्धी दुबे चा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भूषण नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर नंदकिशोर दुबे यांची नात सिद्धी हेमंत दुबे या युवतीने लष्करात फायटर पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिद्धी हेमंत दुबे हिची भारतीय नौदलात फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. त्या प्रित्यर्थ माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी रविवार (ता.११) रोजी भूषण नगर येरखेडा येथे त्यांच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून सत्कार केला,व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिद्धीचे कुटुंबिय आजोबा नंदकिशोर दुबे, वडील हेमंत दुबे, आनंद दुबे यांच्यासह जि प सदस्य मोहन माकडे,भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले,राज्ययोगिनी ब्रम्हकुमारी प्रेमलता दिदी,येरखेड़ा उपसरपंच मंदा महल्ले आणि राजेंद्र चवरे,नारायण नितनवरे, जॉय दत्ता, मुखर्जी, हांडा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धी नागपूरच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिची दोनदा भारतीय सैन्यदलात निवड झाली होती. पण तिने ‘इंडियन नेव्ही एव्हीएशन’ला प्राधान्य दिले. तर सिद्धी च्या परिवारातील वडील हेमंत दुबे भारतीय वायुसेना मध्ये १७ वर्ष सेवा करून निवृत्त झाले असून आजोबा नंदकिशोर दुबे सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनी एक तक्रार निकाली

Mon Jun 12 , 2023
नागपूर :-  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित तक्रारींचा आढावा घेण्यात आला आणि एक तक्रार निकाली काढण्यात आली. उपायुक्त घनश्याम भुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिन पार पडला. उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4Follow us on Social Media […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com