कोदामेंढी :- मागच्या वर्षी वार्ड क्रमांक एक मध्ये वार्ड क्रमांक एक मधील ग्रामपंचायत सदस्य अनिता हटवार ते चंद्रशेखर गुरनुले यांच्या घरापर्यंत भूमिगत नाली चे बांधकाम करण्यात आले. मात्र हे भूमिगत नालीचे बांधकाम भूमीच्या वर म्हणजे जमिनीच्या वर केल्याचे वार्ड क्रमांक एक चे रहिवासी तेली समाजाचे अध्यक्ष केशव बावनकुळे यांनी सदर वार्ताहरला प्रत्यक्ष भेटून सांगितले.
त्यामुळे यंदा पावसाळ्यातील पाणी या जमिनीच्या वर बनवलेल्या नालीच्या चेंबरमध्ये जात नसून रस्त्यावरच राहत आहे. त्यामुळे रस्त्या चिखलमय झालेला आहे. याबाबत सरपंच आशिष बावनकुळे यांना भेटण्यास ग्रामपंचायत कार्यालयात गेलो असता सरपंच गावात मुक्कामी राहत नसल्याचे त्यांना कळले. त्यांच्या पत्नीची नोकरी जिथे ते तिथे असेही त्यांना कळले. उन्हाळ्यात त्यांच्या पत्नीची नोकरी नागपूरला होती म्हणून ते नागपूरला मुक्कामी राहायचे व कोदामेंढीला अपडाऊन करायचे, आता पावसाळ्यात त्यांच्या पत्नीची नोकरी कामठी येथे असून ते रामटेक येथे मुक्कामी राहत असल्याचे व कोदामेंढी येथे अपडाऊन करत असल्याचे त्यांना कळले. त्यांना वारंवार भ्रमणध्वनी वरूनही संपर्क साधला असता ते प्रतिसाद देत नसल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार ग्रामपंचायतच्या चकरा मारल्यानंतर रामटेक वरून अपडाऊन करत असताना एकदा त्यांची भेट झाली, त्यांना चिखलमय झालेल्या रस्त्यावर रेतीच्या गळंगा टाकण्याची विनंती केली, परंतु ग्रामपंचायत कडे आता एकही रुपया नसून, रेतीच्या गडंगा टाकण्यासाठी तुम्ही मला एक लाख 25 हजार देत असाल तर आत्ताच टाकतो, असे ते म्हणाल्याचे केशव बावनकुळे यांनी सांगितले. तसेच ती भूमिगत नाली भविष्याच्या वेध घेऊन रोड उंच होणार असल्याने, जमिनीच्या वर बनविण्यात आल्याचे त्यांना ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
वर्तमानच्या समस्या सोडविण्याकरता ग्रामपंचायत प्रशासनाकडे पैसा नाही तर भविष्याच्या विचार करून वर्तमानात समस्या निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत कडे शासन लाखो रुपयाच्या निधी पाठवतो का? असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनासमोर मांडला आहे. तसेच सरपंच गावात मुक्कामी नसल्याने त्यांचे गाव विकासाकडे पूर्ण लक्ष नसून दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.