संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 28 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राणी तलाव मोक्षधाम येथे नागसेन नगर , मोदी पडाव कामठी रहिवासी सिद्धार्थ हुमने यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कार्यक्रमादरम्यान मृतकाला अग्नीचा टेंबा लावून डिझेलचा भडका उडाल्याने तीन जण जळून गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली असता या अंत्ययात्रेत असलेलया शोकाकुल नागरिकांत सर्वत्र एकच पळापळ सुटली.गंभीर जख्मी मध्ये सुधीर डोंगरे वय 45 वर्षे ,दिलीप गजभिये वय60 वर्षे ,तसेच सुधाकर खोब्रागडे वय 50 वर्षे तिन्ही राहणार खलाशी लाईन नागसेन नगर कामठी आहे.यातील दोन जख्मीना उपचारार्थ कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता परोस्थिती नाजूक असल्याने नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले तर जख्मी सुधाकर खोब्रागडे हे कामठी च्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.