नागपुर – औष्णिक विद्युत केंद्र कोराडी येथे नुकतेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षार्निमित्य आयोजित करण्यात आलेल्या श्रमश्री सूनेत्र प्रकल्पा अंतर्गत ४० वर्षावरील कंत्राटी कामगार विमेदारांसाठी राज्य कामगार विमा योजना रूग्णालय, नागपुर तर्फे नि:शुल्क रोग निदान शिबीरचे आयोजन करण्यात आले.
कंत्राटी कामगारांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी ह्या आरोग्य शिबीरचे आयोजित करण्यात आले. या शिबीरात १५० कंत्राटी कामगार विमेदारासाठी नेत्र तपासणी,रक्त तपासणी, हदय तपासणी,रक्तदान तपासणी, ECG सह इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यासाठी विमा रुग्णालय नागपुर यांच्या तर्फे सर्व तज्ञ वैदकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन कांबळे, डॉ.शुभम इंगळे, डॉ.सागर राजूरकर, डॉ.साठे व इतर चमू टीना बरडे, गणेश आचार्य , व्ही मस्करे, आकांशा नारनवरे, पराग तरार व औष्णिक विद्युत केंद्र कोराडीचे मुख्य अभियंता अभय हरणे सुनील सोनपेठकर,उपमुख्य अभियंता,अशोक भगत,अधीक्षक अभियंता, महेंद्र जीवने,अधीक्षक अभियंता-२१० मे वॅट, विलास मोटघरे,अधीक्षक अभियंता,डॉ. मुकेश गजभिये,वैदकीय अधीक्षक, सौ. प्रीती रामटेके (कल्याण अधिकारी) व अधिकारी कर्मचारी वर्ग, तसेच संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगारांकरिता योग शिबीर आयोजित करण्यात आले,यात ३५ लोक सहभागी झाले.