मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक १ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक, चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार आहे.
प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील Candidates Information >Instructions>General Instructions येथे ‘Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे, असे आयोगाने कळविले आहे.