कृषी योजनांच्या माहीती मेळाव्याची सांगता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज 24 ऑगस्ट ला कामठी पंचायत समिती सभागृहात मंडळ कृषी अधिकारी कामठी अधिनस्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने चा कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कृषी योजनांचा माहिती मेळावा 18 ते 24 ऑगस्ट या कार्यक्रमाची सांगता, तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा प्रचार प्रसार व लाभार्थी नोंदणी अभियान कार्यक्रम एकत्रितपणे राबविण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष तसेच उद्घाटक स्मार्ट नागपूरचे नोडल अधिकारी अरविंद उपरीकर तसेच प्रमुख वक्ते आशिष दुपारे बँक ऑफ महाराष्ट्र कामठीचे शाखा व्यवस्थापक आशिष दुपारे, जिल्हा संसाधन व्यक्ती नागपूर चे योगराज वाघमारे, कामठी तालुका कृषी अधीरी दिपाली कुंभार तालुका कृषी , मंडळ कृषी अधिकारी गौरखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक नोडल अधिकारी अरविंद उपरीकर यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी,ए आई एफ योजनेबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन केले. योगराज वाघमारे यांनी PMFME योजनेबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले. आशिष दुपारे यांनी बँक लोनशी निगडित आवश्यक कागदपत्रे तसेच येणाऱ्या अडचणीचे निराकरण केले. तालुका कृषी अधिकारी कुंभार मॅडम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विराग देशमुख कृषी पर्यवेक्षक कामठी 1 यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी बि जीभकाटे कृषी पर्यवेक्षक कामठी 2 यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये PMFME योजनेचे लाभार्थी कढोलीचे मीनाक्षी वाघ , (मसाला प्रक्रिया उद्योग) घोरपड चे मुरलीधर मानमुदरे ( दुग्ध प्रक्रिया व दुग्ध पदार्थ,)लिहिगाव चे संजय ठाकरे ( दाल मिल प्रक्रिया युनिट, )नांदा चे बेबी खुबेले ( पापड व गृह उद्योग,) नेरीचे हरिहर नाटकर संचालक FPO मौजा नेरी यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी लाभार्थ्यांना AIF योजनेवर मार्गदर्शनपर व्हिडिओ दाखवण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सहाय्यक सागर कर्डुले , सुनील उज्जैनवार, ब्रिज कुमार जोशी, मीनाक्षी राठोड, नलिनी रामटेके , सुनिता राठोड, कविता ढोके यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेश जी की बर्फ से निर्मित झांकी बनी आकर्षण का केन्द्र

Thu Aug 24 , 2023
– आज की झांकी में कान्हा करेंगे नौका पर यमुनाभ्रमण नागपूर :- श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर में सावन झूला उत्सव भक्ति भाव के साथ जारी है। बुधवार को शहर के गणेश टेकड़ी व अष्टविनायक की बर्फ से निर्मित सुन्दर झांकी बनाई गई। झांकी के दर्शन से ऐसा लग रहा था मानों जैसे टेकड़ी गणेशजी खुद विराजमान हुए हो। उसी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com