– उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याचे लक्ष्य- डॉ. प्रशांत माहेश्वरी
-विजयी स्पर्धकांना पुरस्काराचे वितरण
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान सप्ताहाचा समारोप शुक्रवार, दिनांक ३ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणामधील प्रमाण वाढविणे हेच लक्ष्य असल्याचे प्रतिपादन केले. विद्यापीठाच्या गणित विभागातील रामानुजन सभागृहात समारोपीय कार्यक्रम पार पडला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, विज्ञान सप्ताहाचे समन्वयक डॉ. उमेश पलीकुंडवार, सहसमन्वयक डॉ. विजय तांगडे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. माहेश्वरी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत माहिती दिली. अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे. उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. पहिल्या धोरणापासून ते आज पर्यंत २७ टक्के प्रमाण राहिले आहे. २०२३ ते २०३५ पर्यंत हे प्रमाण म्हणजेच ग्रॉस एनराॅलमेंट रेशो ५० टक्क्यावर न्यायचा असल्याचे माहेश्वरी म्हणाले. कोणतीही जाहिरात किंवा संकेतस्थळावर जाहीर करता आयआयटी चेन्नईने ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. बीएससी डेटा व बीएससी सायन्स या अभ्यासक्रमासाठी २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्व परीक्षा दिली. यात १६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. वर्ग नाही, शिक्षकांची फिजिकली उपस्थिती नाही, क्लासरूम नाही, केवळ ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक सत्र २०२१- २२ मध्ये या तीन वर्षीय अभ्यासक्रमाची प्रथम बॅच निघाली. प्रथम वर्ष पूर्ण करीत सोडून दिल्यास प्रमाणपत्र, द्वितीय वर्षी सोडून दिल्यास पदविका तर तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर पदवी दिल्या जाते. ‘मल्टिपल एंटर मल्टिपल एक्झिट’ अशा ऑनलाइन अभ्यासक्रमांची नितांत गरज आहे. याकरिता आगामी काळात डिजिटल विद्यापीठ स्थापन होणार असल्याचे डॉ. माहेश्वरी म्हणाले.
विजयी स्पर्धकांना पुरस्कार
विज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना समारोपीय कार्यक्रमात पुरस्कार वितरित करण्यात आले. वॉल पेंटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पराग सोहोनी आणि पथक, द्वितीय क्रमांक सुमित राऊत आणि शुभम टिंगणे यांनी तर उत्तेजनार्थ पुरस्कार सिमरन शरणागत आणि पथकाने पटकावला. निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार याशी पीटर, द्वितीय क्रमांक रोशनी कटरे पर उत्तेजनार्थ पुरस्कार श्रेया विकास पांडेला मिळाला. वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम पुरस्कार अंबर जलील, द्वितीय पुरस्कार रोहिणी भगत तर उत्तेजनार्थ पुरस्कार ओम ढोक याला मिळाला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक दिलीप राघवन, अनुष्का, नितीन इंगळे, अनुराग लोखंडे यांच्या पथकाने पटकावला. द्वितीय क्रमांक मनस्वी भुते समीर त्रिपाठी, आकाश भारती यांच्या पथकाने पटकावला. सीनॉफ्सिस स्पर्धेत प्रथम क्रमांक मनोज वरंबे, द्वितीय क्रमांक मृणाल गंडोले तर उत्तेजनार्थ पुरस्कार पियुष तेलंग यांना मिळाला. लाईफ सायन्स स्पर्धेत प्रथम क्रमांक दिबा खान, द्वितीय क्रमांक रोहन ठावरे तर उत्तेजनार्थ हर्ष चांडकने मिळविला. विज्ञान प्रदर्शनात प्रथम पुरस्कार वैभव भगत, द्वितीय पुरस्कार दिबा खान तर उत्तेजनार्थ पुरस्कार तानिया पालीवाल हिने पटकावला. पोस्टर प्रेझेंटेशन प्रथम पुरस्कार नबीरा कॉलेज काटोल, द्वितीय पुरस्कार आरजेबीसी नागपूर तर उत्तेजनार्थ नॅन्सी ठोंबरे हिला मिळाला. सर्वच स्पर्धेत द्वितीय पुरस्काराला प्रमाणपत्र व २ हजार रुपये रोख तसेच प्रथम पुरस्काराकरिता प्रमाणपत्र व ५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. विज्ञान सप्ताहाच्या यशस्वीतेकरिता आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, समन्वयक डॉ. उमेश पलीकुंडवार, सहसमन्वयक डॉ. विजय तांगडे, इव्हेंट इन्चार्ज डॉ. संयुक्ता थोरात, डॉ. हरीश वाळके, डॉ. रवीन जुगादे, डॉ. रिता वडेतवार, डॉ. विना बेलगमवार, डॉ. रूपेश बडेरे, डॉ. अभय देशमुख, डॉ. पायल ठावरे, डॉ. रवी खानगय, डॉ. किशोर इंगळे, डॉ. आरती शनवारे, डॉ. अमोल गुल्हाणे, डॉ. अपर्णा समुद्र, डॉ. नितीन डोंगरवार, डॉ. राजेश उगले, डॉ. सत्येंद्र प्रसाद, डॉ. धिरज कदम, डॉ. अर्चना मून, डॉ.श्रद्धा शिरभाते, डॉ. अंजली गांजरे, डॉ. प्रज्ञा अनासाने यांनी प्रयत्न केले.