नागपूर :- विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण प्रभाकरराव दटके यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत प्राप्त संगणकीय साहित्य ५० संगणक, ७ प्रिंटर व १ स्कॅनर नागपूर महानगरपालिका शाळांना सुपूर्द करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, माजी महापौर माया इवनाते, नंदा जिचकार, दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक अस्लम शेख, मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्यासह मनपा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार प्रवीण दटके यांच्या आमदार निधीतून हे प्राप्त संगणकीय साहित्य प्राप्त झाले असून, कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मनपाच्या आठ शाळांच्या मुख्यध्यापक व विद्यार्थ्यांना संगणक, प्रिंटर व स्कॅनर सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी केले.
मनपाच्या जी. एच. बनातवाला इंग्रजी हायस्कूल, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा, डॉ. राम मनोहर लोहिया हायस्कूल, गंजीपेठ उर्दू हायस्कूल, एकात्मतानगर प्राथमिक शाळा, प्रियदर्शनी मराठी प्राथमिक शाळा, दुर्गानगर हिंदी हायस्कूल, साने गुरुजी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शाळांना ५० संगणक, ७ प्रिंटर व १ स्कॅनर हे संगणकीय साहित्य देण्यात आले. याप्रसंगी शाळांच्या मुख्याध्यापिका ज्योती काकडे, भारती गजाम, वसुधा वासाडे, माधुरी काटकर, समीना अली, सुनंदा लोखंडे, वर्षा भोसले, संजय चिचुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत टेंभुर्णे यांनी केले. यावेळी सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, विजय वालदे, सीमा खोब्रागडे उपस्थित होते.