नागपूर :- केंद्रिय मंत्रालय व वस्त्रौध्योग मंत्रालयाच्या साहाय्याने देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी अतिघन कापूस लागवड पद्धतीचा पथदर्शी प्रकल्पाला आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये मान्यता मिळाली आहे. त्यानुसार सिटी- सीडीआरए महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या कर्मचाऱ्यांचे “कृषी तंत्रज्ञान -कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचे आयसीएआर सी. आय.सी.आर. नागपूर द्वारे 5 जुलै रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर उद्घाटन सत्रासाठी डॉ.वाय.जी. प्रसाद सी.आय.सी आर. संचालक केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर डॉ.ए.एल वाघमारे संचालक, कापूस विकास संचालनालय नागपुर, व डॉ.ए.एस.तायडे, सी.आय.सी आर. विभाग प्रमुख हे मान्यवर उपस्थित होते. डॉ.वाय.जी. प्रसाद, डॉ.अरविंद वाघमारे, डॉ.अर्जुन तायडे यांनी कापसावरील विशेष प्रकल्प 2024-25 ची मार्गदर्शक तत्त्वे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ.वाय.जी.प्रसाद यांनी केले सांगितले की, कृषीमंत्री वस्त्रोद्योग मंत्री केंद्र सरकारचे सचिव आणि मंत्रालयाचे इतर अधिकारी भेट देऊन प्रकल्पाचा आढावा घेतील आणि प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांशी थेट मोबाईलवर संपर्क साधू शकतात. डॉ. वाघमारे यांनी मंत्रालयातून यावर्षी प्रकल्पाला अधिक भेटी दिल्या जातील असे सांगितले आहे. डॉ.अर्जुन तायडे यांनी विशेष प्रकल्पांची माहिती देऊन या वर्षात प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला. डॉ. रामकृष्ण, डॉ.रामटेके, डॉ. बाबासाहेब फंद, डॉ.मणिकंदन, डॉ. गावंडे यांनी अतिघन कापूस लागवड आणि जवळचे अंतर, झाडावरील कीटक, रोग नियंत्रण याविषयी लागवड तंत्राची माहिती दिली. सीआयसीआर कर्नाटकातील डॉशंकरन आणि डॉ.राजा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ईएलएस कापूस लागवडीविषयी सविस्तर माहिती दिली होती. गोविंद वैराळे यांनी 2023-24 मध्ये राबविण्यात आलेला प्रकल्प आणि 2024-25 मध्ये महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आराखडा सदर केला. सीआयसीआर मधील अतिघन कापूस लागवड डेमो प्लॉटमधील फील्ड व्हिजिट आणि कॉटन प्लॉटचे जवळचे अंतर दाखवले होते. डॉ.देशमुख मॅडम व डॉ.मणिकंदन यांनी प्रशिक्षणाला उपस्थितांचे आभार मानले. या प्रशिक्षणाला प्रकल्प अधिकारी अमित कवाडे, युगांतर मेश्राम,आरबीएस तोमर, राकेश पाटीदार, अनिश चौहान, जगदीश नेरलवार आणि कापूस विस्तार सहाय्यक सिटी- सीडीआरए चे सुमारे 40-50 कर्मचारी प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते.