तिलारी प्रकल्प मार्च २३ पर्यंत पूर्ण करा ; दुसऱ्या टप्प्यास १५ जूलै पर्यंत मंजूरी घ्यावी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुबई : तिलारी प्रकल्पावर आधारित १८ गावेवेंगुर्ला शहर व मार्गस्थ औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटनस्थळांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा तसेच तिलारी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत मंजुरी घ्यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात तिलारी प्रकल्पावर आधारित प्रकल्पाविषयी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दिपक केसरकरपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्यासह रा. पा. निघोटसी. आर. गजभियेप्रशांत भामरेनितीन उपरोलडी. एच. अरगडेयु. एच. महाजन आदीं अधिकारी उपस्थित होते.

मंत्री  पाटील म्हणालेमंजूर योजनेनुसार तिलारी धरणापासून 25 किलोमीटर अंतरावर  सासोली येथे तिलारी नदीच्या उजव्या तीरावर जॅकवेल व पंपगृह बांधण्यात येत असून त्यास लागून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात येत आहे. जॅकवेल मधून पाणी व्हर्टिकल टर्बाईन पंपाद्वारे उपसून  डेगवे येथील दाबमोड टाकीत घेऊन व तेथून लाभधारक कंपनी  उत्तम स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेड (SUSPL) सातार्डे यांना लागणारे शुद्धीकरण विरहित पाणी थेट पाइपलाइनद्वारे पुरविण्यात येणार होते. उर्वरित पाणी डेगवे येथेच प्रस्तावित जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करुन पाईप लाईनव्दारे वेंगुर्ले पर्यंत नेले जाणार असून मार्गस्थ लाभधारक गावांनापर्यटन व आद्यौगिक क्षेत्रात तसेच वेंगुर्ला शहरास पाणी पुरविण्यात येणार आहे.

तिलारी प्रकल्पाची योजना राबविण्यासाठी सहभागी ठेकेदार मे. श्री उत्तम स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेड (SUSPL) यांच्याबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सामंजस्य करार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री पाटील म्हणालेयोजनेंतर्गत प्रस्तावित उपांगांच्या जमिनी ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. योजनेसाठी आवश्यक इतर खात्यांकडून उदा. सार्वजनिक बांधकाम विभागजिल्हा परिषद सिंधुदुर्गकोकण रेल्वेराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणभूसंपादन शाखा (जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग) परवानग्या प्राप्त करण्यासाठी सर्व कार्यवाही पूर्ण केली आहे.  योजनेंतर्गत प्रस्तावित गुरुत्ववाहिन्यांकरीता ७७.२३ कि.मी. इतक्या सर्व लांबीच्या डी. आय. पाईप्सचा पुरवठा करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दारूविक्री च्या वादातून निलडोह येथे युवकाची हत्या

Thu Jun 16 , 2022
हिंगणा  :- एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत निलडोह या गावात एका २२ वर्षीय युवकाची त्याच गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना काल रात्री ९ च्या सुमारास जुना निलडोह च्या मागच्या रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. चेतन अंकुश मोहर्ले (वय २२)असे मृतकाचे नाव असून काही गुन्हे त्याच्या नावाने एमआयडीसी पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com