‘हाऊस टू हाऊस’ सर्वेक्षण तातडीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

– मतदार नोंदणीचा घेतला आढावा

नागपूर :- बीएलओ ॲपच्या माध्यमातून हाऊस-टू-हाऊस सर्वेक्षणाचे शंभर टक्के काम पूर्ण करा. निधन झालेले मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार यांच्याबाबतीत नाव वगळणे, मतदारांच्या नाव, वय, पत्ता, फोटो यातील दुरुस्त्यांची कार्यवाही बीएलओ ॲपच्या माध्यमातून तातडीने शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज आयोजित बैठकीत दिले.

मतदार नोंदणीसह निवडणूक विषयक विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यावेळी उपस्थित होते.

मतदार नोंदणी करणा-या कर्मचाऱ्यांनी नोंदणीसाठी सर्वेक्षण वाढवावे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सक्रियतेने मतदार नोंदणीसह हाऊस टू हाऊस सर्वेक्षण गतीने होत आहे. नागपूर शहरातही मतदार नोंदणीत वाढ होण्याची गरज आहे. मिशन युवा अंतर्गत 18 ते 19 वर्षे वयोगटातील 75 हजार नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य बाल धोरणात सोशल मीडियासह, अंमली पदार्थांपासून बालकांना परावृत्त कार्यक्रमाचा समावेश करा - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Thu Sep 14 , 2023
मुंबई :- बालके व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल, सोशल मीडिया आणि अंमली पदार्थाचे व्यसन जडल्याचे निदर्शनास येत आहे. या व्यसनांपासून मुलांना परावृत्त करण्यासाठीच्या (डीटॉक्स) कार्यक्रमाचा समावेश करून, बाल धोरणाचा मसुदा जलदगतीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. बालविवाह प्रतिबंधासाठी उपाययोजना, महाराष्ट्र बाल धोरण, महिला धोरण, पाळणाघर योजना, अंगणवाडी सेविकांच्या कामकाजाचा आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com