संततधार पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान भरपाई देण्याची उपसभापती हुपराज जमयवार यांची मागणी

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया – जिल्ह्यात गावातील परीसरात काल पासून पाण्याची रिपरिप सुरू असताना दुपार पासून पाण्याची दमछाक सुरू झाली व रात्री पाण्याने चागंलेच मेघगरजनासह झोडपले व रात्री पासून पाण्यात वाढ झाली. वैनगंगा बावनथळी काल सायंकाळी पर्यंत रिकामी होती व आज सकाळी पाण्याने फुगुन दोन्ही पाट समान भरून जात आहे.नदीच्या पाण्याचा पात्रात वाढ सुरू आहे. परीसरातील नाल्याला महापुराचे स्वरूप आले असून चांदोरीखु बघोली रस्त्यावर दोन फुट पाणी वाढल्यामुळे आवागमंन थांबले आहे तर बोरा सोनेगाव, बोदा, अत्री, गोमाटोला मरारटोला व तालुक्यातील अन्य रस्ते वर पाणी आहे. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पीक रोहिणी लावलेले होते .ते सगळे पाण्याने बुडाले आहेत. शासनाने धान खराब झालेल्या पीकाचे सर्वेक्षण करून मदत शेतकरी ला देण्यात यावी. अशी मागणी उपसभापती हुपराज जमईवार यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संततधार पडलेल्या पावसामुळे गावातील कोसळलेले घर व गोठेची जि.प. सदस्य किरण पारधी यांनी केले पाहणी

Wed Jul 13 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मागील दोन दिवसांपासून सतत जोरदार पावसाच्या हजेरीमुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशामध्येच अनेकांची घरेदारासह जनावरांचे गोठे संततधार पावसामुळे पडले असून काहींना रहायला घर नाही. तर काहींची घर अर्धवट पडल्याचे चित्र सध्या तालुक्यातील गावात दिसुन येत आहे.यांची माहीती मिळताच कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य किरण पारधी यांनी करटी खुर्द गावांसह अन्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com