संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 18 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा रहिवासी व खाजगी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे सात दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव टिकेश खुशाल सपाटे वय 45 वर्षे रा मोंढा ,कामठी असे आहे. उल्लेखनीय आहे की सदर मृतकाचे वडील खुशाल सपाटे यांचा नुकतेच काही महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्याने मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा आज सकाळी उठून बाहेरून फिरून घरी आला व आपल्या राहत्या घरातील खोलीतील छताच्या लोखंडी पाईप ला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही .
मृतकाच्या पाठीमागे आई,पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे.सदर घटनेने सपाटे कुटुंबियासह परिसरात शोककळा पसरली आहे तर या आत्महत्येचे घटनेने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.