विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधा निर्माण करणार – आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी

नागपूर :- विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळांसाठी अद्ययावत व सुसज्य सुविधा निर्माण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल उभारणीच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त आयुक्त तथा विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या उपाध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री यांचे प्रतिनिधी संदीप जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे, महानगरपालिकेचे नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटिल, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, पोलीस निरीक्षक विजय माहुरकर बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याबाबत तसेच आमंत्रित सदस्य म्हणून राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक व खेळाडूंची निवड करण्यासंबंधी विविध मानकांवर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी विभागीय कार्यकारी समितीचे सदस्य तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बापू देशमुखांना राग अनावर, मिशनच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले

Wed Jul 19 , 2023
– प्रतिमा मलीन होत असल्याची स्पष्टोक्ती : सोनटक्केंच्या तक्रारीने खळबळ नागपूर :- श्री संत गाडगे महाराज मिशनविरूद्ध येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर मिशनच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर सोमवारी (ता.17) मिशनचे उपाध्यक्ष तथा आजीव ज्येष्ठ सभासद उत्तम उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी नागरवाडी (ता.चांदूरबाजार) येथे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवित मिशनच्या चेअरमनसह अन्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com