आयुक्तांच्या निवासस्थानासाठी मनपा जाणार कोर्टात

– स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांची माहिती
– पुढील निर्णय घेण्यासाठी उपमहापौर राहुल पावडे प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त
– आयुक्तांचे विद्यमान निवासस्थान रिक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
– निवासस्थान नुतनीकरण व परिसर विकासासाठी मनपाचे ४० लाख खर्च  

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांचे निवासस्थान रिक्त करुन

चंद्रपूर – आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांना निवासस्थान नसल्याने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शासकीय निवासस्थान समिती दिनांक १४/०५/२०१८ ला झालेल्या सभेमध्ये शासकीय निवास्थान क्र. ३/३ हे जागेसहित आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचे ठरले. २०१९ पासून मनपा आयुक्त या निवासस्थानी वास्तव्यास असतात. त्यासाठी निवासस्थान नुतनीकरण व परिसर विकासासाठी मनपाने ४० लाख खर्च केले. मात्र, आता निवासस्थान दिनांक ०८/०२/२०२२ नुसार तहसिलदार चंद्रपूर यांना अभिहस्तांकीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता आयुक्तांसाठी शासकीय निवासस्थान नसल्याने उचित जागेचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार जागा खरेदी व निवासस्थान बांधकाम करावे लागणार आहे. दरम्यान, ४ मार्च २०२२ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत आयुक्तांच्या निवासस्थानासाठी कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर पुढील निर्णय घेण्यासाठी उपमहापौर राहुल पावडे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचे स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे कार्या. पत्र क्रमांक साशा / कार्या – १० / स्थानि -३ / २०१८ / ३५ प्राप्त दिनांक १० /०१ /२०१ ९ अन्वये आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांना आर. आर. क्वार्टर क्र. ३/३ , सिव्हील लाईन, चंद्रपूर हे निवास स्थान वाटप करण्यात आलेले आहे . निवासस्थान समितीमध्ये ठरल्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मनपाने सदर ठिकाणी जिर्ण अवस्थेते असलेले निवासस्थान नुतनिकरण व परिसर विकासाचे काम हाती घेतले. त्यावर सुमारे रुपये ४० लक्ष निधी मनपाचा खर्च झालेला आहे. यापूर्वी सदर निवासस्थान मनपाला हस्तांतरीत झाल्यामुळे व मनपाचा निधी खर्च करुन त्याठिकाणी निवासस्थानाचे नुतनीकरणकरण्यांत आलेले आहे. तद्नंतर मा. जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांचे पत्र क्रमांक साशा / कार्या १० / स्थानि -३ / २०२० / ३१० दिनांक १४/०२/२०२० नुसार सदरचे आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका , चंद्रपूर यांना हस्तांतरीत करण्यात आलेले शासकीय निवासस्थान ३/३ हे महसुल विभागास परत करण्याचे कळविले. यावर तत्कालीन आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली शासकीय निवासस्थान समिती सभा दिनांक १४/०५/२०१८ चे इतिवृत्त मधील मुद्दा क्रमांक ७ नुसार पूर्वी तहसिलदार, चंद्रपुर राहत असलेले राजस्व खात्याचे निवासस्थान क्रमांक ३/३, सिविल लाईन, चंद्रपूर हे निवासस्थान जागेसहित आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपुर यांना देण्याबाबत सुचित केले व शहरात आयुक्तांना निवासस्थान असणे आवश्यक असल्याने सदर निवासस्थान देखभाल व दुरुस्तीसहित महानगरपालिका, चंद्रपूरला हस्तांतरीत करण्याचे ठरले . त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आयुक्त निवासस्थानकरिता तरतुद करुन जुने निवासस्थान पाडुन त्याठिकाणी नविन आयुक्तांचे निवासस्थान बांधलेले आहे . सबब सदरचे निवासस्थान महानगरपालिकेला हस्तांतरीत झाल्यामुळे व महानगरपालिकेचा निधी खर्च करुन त्याठिकाणी नविन निवासस्थान बांधल्यामुळे सदरचे निवासस्थान परत करता येऊ शकत नाही, असे मा . जिल्हाधिकारी , चंद्रपुर यांना कळविले. पंरतु त्यातरही मा . जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांचे पत्र क्रमांक साशा / कार्या -१० / स्थानि -३ / २०२२ / १४० दिनांक ०८/०२/२०२२ नुसार उपरोक्त निवासस्थान तहसिलदार चंद्रपुर यांना अभिहस्तांकीत करण्यात आले आहे .

सदरचे प्राप्त होताच आयुक्त , चंद्रपूर शहर महानगरपालिका , चंद्रपुर यांनी पत्र क्रमांक चेशमनपा / बांध / कार्या -२ / २०२२ / ३२५७ दिनांक ० ९/ ०२ /२०२२ नुसार सदर निवासस्थान महानगरपालिकेचा निधी खर्च झालेला आहे व या निवासस्थानाचे नुतनीकरण महानगरपालिका, चंद्रपुर मार्फत करण्यात आले आहे . महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार शहरातील नागरीकांना पुरविण्यांत येणा – या सेवांची प्रमुख संस्था म्हणुन महानगरपालिका कार्यरत असते . शहराच्या या प्रमुख संस्थेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्त हे कार्यरत असतात. सबब आयुक्त यांनी शहरात घर भाडयाचे घेवून राहणे उचित वाटत नाही. याकरिता निवासस्थान क्रमांक ३/३ सिविल लाईन हे आयुक्त चंद्रपुर शहर महानगरपालिका , चंद्रपुर यांचेकडे कायम ठेवणेस विनंती करण्यात आली . तसेच याबाबत मा . विभागीय आयुक्त , नागपूर विभाग , नागपुर यांना पत्र क्रमांक चंशमनपा / बांध / कार्या – २/२०२२/३३३५ दिनांक १५/०२/२०२२ नुसार सदर निवासस्थान आयुक्त , चंद्रपुर शहर महानगरपालिका , चंद्रपुर यांचेकडे ठेवण्यास मा . जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांना उचित निर्देश द्यावे , अशी विनंती केली आहे . परंतु मा . जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे पत्र क्रमांक साशा / कार्या -१० / स्थानि -३ / २०२२/२४१ दिनांक २६/०२/२०२२ नुसार शासकीय निवासस्थान क्रमांक ३/३ सिविल लाईन, चंद्रपुर हे तात्काळ आहे त्यास्थितीत रिक्त करुन आपली पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देशित केले आहे. त्यामुळे सदर निवासस्थान परत केल्यामुळे आयुक्त चंद्रपुर शहर महानगरपालिका, चंद्रपुर यांचेकरिता शासकीय निवासस्थान नसल्याने उचित जागेचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार जागा खरेदी व निवासस्थान बांधकाम करण्यासाठी स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गरजू आणि गरिबांना केवळ ५०० रुपयात एलपीजी शवदाहिनी

Fri Mar 4 , 2022
मनपाच्या स्थायी समितीचा निर्णय । बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी चंद्रपूर – पारंपारिक पद्धतीने लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषणात भर पडते. त्याला आळा घालण्यासाठी बायपास मार्गावरील प्रभागात बाबुपेठ स्मशानभूमी येथे एलपीजी गॅसवर चालणारी शवदाहिनी उभारण्यात आली आहे. या शवदाहिनीसाठी २५०० रुपये शुक्ल आहे. मात्र, गरजू आणि गरिबांनी त्यांच्या प्रभागातील नगरसेवकाचे प्रमाणपत्र सादर केल्यास  ५०० रुपये शुक्ल आकारण्याचा निर्णय मनपाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com