– बांधकाम करताना जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचे दिले निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता. 3) विभागीय क्रीडा संकूल, मानकापूर परिसरात नागपूर स्पोर्ट हबच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडाची व परिसराची पाहणी केली. आयुक्तांनी अंतर्गत रस्ते, क्रीडा शाळा, जिमनॅशियम इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणारे झाडे वाचविण्याचे निर्देश दिले तसेच उर्वरित जागेवरील पुरातन झाडांना सुध्दा वाचविण्याचे निर्देश दिले.
या पाहणीत अति.आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त (उद्यान विभाग) गणेश राठोड क्रीयुसे उपसंचालक तथा विभागीय क्रीडा संकूलचे कार्यकारी समितीचे सदस्य सचिव शेखर पाटील, उद्यान वनसंवर्धक अमोल चौरपगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. प्रशांत शंकरपुरे आणि अभियंता महेंद्र उके, आणि ट्रान्सस्टेडिया टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय क्रीडा संकूल, मानकापूर, नागपूर परिसरात नागपूर स्पोर्टर्स हबचे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकाम प्रकल्पामध्ये इनडोर स्टेडिअम, स्विमिंग पूल, क्रीडा विद्यापीठ, स्पोर्टस स्कूल, वसतीगृह, कॅन्टीन, पवेलियन, टेनिस, व्हॉलीबॉल मैदान इत्यादी इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. या परिसरात असलेल्या विविध प्रजातीच्या 58 पुरातन (हेरिटेज) आणि 307 नॉन हेरीटेज अशी एकून 365 नग झाडे आहेत.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी हेरीटेज आणि नॉन हेरीटेज झाडांची व परिसराची पाहणी केली. तसेच एकून झाडापैकी किती वाचू शकतात, याबाबत माहिती घेतली. तसेच झाडे कापण्याकरीता राज्य सरकारच्या पर्यावरण विभाकडून परवानगी विषयी माहिती त्यांनी घेतली. बांधकामात तयार करण्यात येणाऱ्या स्विमिंग पुलाची जागा बदलविण्याची सूचना केली.
यावेळी डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर स्पोर्टर्स हब तयार करतांना जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचे निर्देश दिले. परिसरातील प्रस्तावित Tennis Court Soft मैदानाच्या बदल करुन झाडे वाचविण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जी झाडे वाचविली जाणार आहे, त्या झाडांना नंबर देऊन रिवाइज प्लॅन सादर करावे. स्पोर्ट हबमध्ये रस्ता तयार करतांना 33 नग झाडे Sport School ईमारतीमधील 110 नग झाडे जिमनॅशियम ईमारतीतील बाधित होणाऱ्या 47 नग अश्या एकूण 190 नग वृक्षास वाचवून प्रस्तावित बांधकाम करण्याचे निर्देश दिले. तसेच स्पोर्ट हबचे बांधकाम करीत असताना कापण्यात येणाऱ्या झाडाऐवजी किती झाडांचे वृक्षारोपण केले जाईल याबाबत माहिती घेतली. मानकापूर क्रीडा संकूल परिसरात भरपूर मोकळी जागा असल्याने या प्रकल्पातील प्रस्तावित बांधकामाच्या प्लॅनमध्ये थोडा बदल करून या परिसरातील विवधि प्रजातीचे झाडे वाचवून बांधकाम करण्यात यावे, असे निर्देशही डॉ. चौधरी यांनी दिले. यावेळी मानकापूर येथील स्पोर्ट हबचे बांधकाम होत असताना कापण्यात येणाऱ्या झाडाऐवजी शहरात 8700 झाडांचे वृक्षारोपण केले जाईल अशी माहिती सार्वजनिंक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती आयुक्त यांना दिली.