आयुक्त डॉ. चौधरी यांची गांधीबाग झोन कार्यालयाला भेट

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता:२५) मनपा साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील गांधीबाग झोन कार्यालयाला भेट दिली.

महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे नूतनीकरणाचे कार्य सुरू असल्याकारणाने मनपा साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालय येथे गांधीबाग झोनचे कार्यालय हलविण्यात आले आहे.

नवीन तयार करण्यात आलेल्या गांधीबाग झोन कार्यालयाला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट दिली.

याप्रसंगी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, पुरुषोत्तम फाळके, प्र. झोनल अधिकारी सुरेश खरे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाडकी बहीण योजनेचा लाभ बहुतांश महिलांना देण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करण्याची गरज - ॲड. सुलेखा कुंभारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली सुचना

Fri Jul 26 , 2024
  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी येथील तहसील कार्यालयात पूरग्रस्त लोकांच्या समस्या ऐकुण घेण्याकरिता माजी ऊर्जा मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार टेकचंद सावरकर व अधिका-यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट दिली. जवळपास दीढ ते दोन तास या भेटी दरम्यान अनेक राजकीय, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com