बालकांच्या लसीकरणासाठी पुढे या, मनपाला सहकार्य करा

– विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० च्या सर्वेक्षण कार्यास प्रारंभ

नागपूर :- बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असून, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे, की अर्धवट लसीकरण झालेले, तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. त्यामुळे केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रूबेला आजाराच्या दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले असून, यासाठी केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यापासून तीन फेऱ्यांमध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० ही विशेष मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. या विशेष मोहिमेकरिता नागपूर महानगरपालिके अंतर्गत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचा व गरोदर माता यांचा शोध घेऊन लसीकरण करावयाकरिता सर्वेक्षण कार्य सुरू करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मनपाच्या ANM, आशा वर्कर्स, सर्वेक्षण कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सारला लाड यांनी केले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सारला लाड यांनी सांगितले की, विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० या मोहिमेंतर्गत शून्य ते दोन वर्ष वयोगटांतील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दोन ते पाच वयोगटांतील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार असून, ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. याकरिता मनपाच्या दहाही झोननिहाय ५१ UPHC अंतर्गत सर्वेक्षण कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीम ही पहिला महिना ७ ते १२ ऑगस्ट, दुसरा महिना ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरा महिना ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात शून्य डोस, सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अतिजोखमीचा भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन लसींचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, जास्त दिवस नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, तसेच उपकेंद्राचे आरोग्यसेविकेचे पद तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी रिक्त असलेले क्षेत्र, स्थलांतरित होणारा भाग, गोवर-घटसर्प व डांग्या खोकला, २०२२-२३ या वर्षात उद्रेकग्रस्त भाग, लसीकरणास नकार देणारे व प्रतिसाद न देणारे क्षेत्र यात विशेष मेहनत घेतली जाणार असून, यात लसीकरण करून घेण्यात येणार आहे.

आजचे बालक उद्याचे भविष्य असून, त्यामुळे आपले बालके निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू देऊ नका, तसेच मनपाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण कार्यात सहकार्य करा असे आवाहन ही वैद्यकीय अधिकारी डॉ. सारला लाड यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Fri Jul 21 , 2023
कळमेश्वर :- येथील फिर्यादीची आरोपी बबलू ठाकूर, रा. गोरखपूर उत्तर प्रदेश याचे सोबत गेल्या ६ महिन्यापूर्वी ओळख होवून त्यांच्यात मैत्री होवुन प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला ऑफिसला ड्युटी लावून देतो असे म्हणून फिर्यादी व आरोपी हे रिलेशनशीपमध्ये आले. त्या दरम्यान ते कुठे फिरायला गेले असता, तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत काही फोटो आरोपीचे फोनमध्ये काढले. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीवर संशय घेत असल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com