– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 9:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एस के पोरवाल कॉलेज तसेच भोयर कॉलेज समोर काही अतिक्रमन काऱ्यानी अवैधरित्या अतिक्रमण करून अल्पोहार ची दुकाने थाटण्यात आली होती या दुकानात तसेच परिसरात काही असामाजिक तत्वांच्या तरुणांकडून महाविद्यालयीन तरुणींचो छेड काढणे हे नित्याचेच झाले होते तसेच टवाळखोर प्रकाराला गती आली होती तेव्हा या प्रकरणात कुठलीही अनुचित घटना न घडो व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होवो या सुरक्षात्मक दृष्टिकोनातून कामठी पोलीस स्टेशन तसेच कामठी नगर परिषद च्या संयुक्त पुढाकाराने या दोन्ही महाविद्यालय समोर अतिक्रमित असलेले पान टपरी, चाट दुकाने जप्त करून अतिक्रमण कारवाही करण्यात आल्याचा प्रकार आज दुपारी 12 वाजता करण्यात आला असून या कारवाहीने असामाजिक तत्वांच्या टवाळखोरावर एक प्रकारचा वचक बसून असामाजिक तत्वाच्या तरुणांची कंबर कसण्यात प्रशासनाला यश आले.
ही कारवाही पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर, पोलीस शिपाई दीप्ती मोटघरे, सुजाता कुर्वे, मनीषा माहुरले, रविता सिंगाडे, अर्चना गणवीर, रोशन पाटील, राजू टाकळीकर, तसेच कामठी नगर परिषद चे कर्मचारी स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां, सहाय्यक नगर रचनाकार विक्रम चव्हाण, कनिष्ठ लिपिक प्रदीप भोकरे, रुपेश जैस्वाल आदींनी मोलाची कारवाही केली.
महाविद्यालय समोरील टवाळखोरांची कसली कंबर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com