समाजकार्य महाविद्यालयातर्फे उपजीविका संवर्धन परियोजना प्रकल्पाचे उद्घाटन

– संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 10 :- समाजकार्य महाविद्यालय, कामठी व इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्यूकेशन, नागपूर  या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून न्यू तोतलाडोह (वरंभा) ब्लॉक देवलापार या आदिवासीबहुल गावात उपजीविका संवर्धन परियोजना प्रकल्पांतर्गत शिलाई, कढाई रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या प्राचार्या डॉ.रुबिना अन्सारी होत्या. या प्रसंगी सरपंच वीणाताई ढोरे, इश्यू संस्थेचे अध्यक्ष  राजीव थोरात, सचिव  प्रतिभा अतकरे, रामटेक येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी निंबोणाताई मेंढे,  नंदकिशोर पटिये,संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास, नागपूर, सामाजिक कार्यकर्ते विनोद गजभिये, पत्रकार पंकज चौधरी, विनोद शेंडे,आयक्यूएसी समन्वयक प्रा. निशांत माटे, डॉ.प्रणाली पाटील, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. ओमप्रकाश कश्यप आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील सरपंच वीणाताई ढोरे व मान्यवरांच्या हस्ते शिलाई – कडाई रोजगार प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व प्रकल्प फलकाचे अनावरण झाले. गावातील महिलांना त्यांच्याच परिसरात रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आदिवासी भागात सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाला शिवणकामाच्या प्रशिक्षणासाठी दोन्ही संस्थांतर्फे शिलाई मशीनी भेट देण्यात आल्या तसेच भरतकामाचे साहित्य पुरविण्यात आले.याकरिता गावातील अनुभवी महिलांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. याबरोबरच गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी जलसंवर्धन उपक्रम, किचन गार्डन उपक्रम व  शिक्षणात्मक सहयोग हे तीन उपक्रमसुद्धा सुरू करण्यात आले. इश्यू संस्थेचे अध्यक्ष राजीव थोरात यांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला सक्षमीकरणासंदर्भात सदर प्रकल्प कसे मोलाचे कार्य करेल याविषयी सविस्तर माहिती देऊन शिक्षण आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर वीणाताई ढोरे, प्रतिभा अतकरे, निंबोणाताई मेंढे,नंदकिशोर पटिये, विनोद गजभिये, प्रा. निशांत माटे, डॉ.प्रणाली पाटील यांनी गावातील महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ.ओमप्रकाश कश्यप यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सामूहिक अभिवादन

Thu Mar 10 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:- बहुजन रिपब्लिकन एकता मंच तफे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माल्यार्पण करुण श्रद्धांजलि देण्यात आली. त्या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे कार्यकर्ता जिल्हा उपाध्यक्ष उदास बनसोड ,कामठी शहर अध्यक्ष दिपंकर गणविर, माजी नगर सेविका सावला गजभिये, शिवपाल यादव, अंकुश बांबोर्डे, अनुभव पाटिल, मनीष डोंगरे, शरद रहाटे मुन्ना रामटेके व बरिएम चे कार्यकर्ता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com