संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– आंबेडकरी चळवळीचा एक निळा क्रांतीकारी हरपला-राजेश गजभिये
कामठी :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी, भीम पत्रिकाचे संपादक, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, साहित्यिक राजनेता, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्युच्या दिवशी शासकीय नोकरीचा राजीनामा देवून सामाजिक कार्यात पुर्ण वेळ देणारे, आंबेडकरी आंदोलनाचे निष्ठावंत शिपाई, प्रसिद्ध आंबेडकरवादी लेखक श्रद्धेय लाहोरी राम बाली ( L R Balley) यांचे पंजाबच्या जालंधर येथे 6 जुलै रोजी वयाच्या ९४ वर्षी दुःखद निधन झाले असून ते. राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे सोबत समता सैनिक दलाचे केंद्रीय नेतृत्व भारतभर केले आहे .या दुःखद घटनेने आंबेडकरी चळवळीचा एक महत्वपूर्ण निळा क्रांतीकारी हरपला असल्याचे मौलिक प्रतिपादन प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे पदाधिकारी राजेश गजभिये यांनी श्रद्धेय एल आर बाली यांच्या सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमात व्यक्त केले. दरम्यान परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर,कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम,माजी नगरसेवक विकास रंगारी, गीतेश सुखदेवें,आशिष मेश्राम, कोमल लेंढारे, राजेश कांबळे, प्रमोद खोब्रागडे,मंगेश खांडेकर,राजन मेश्राम, दिनेश पाटील,सुमित गेडाम,रायभान मेश्राम,सुभाष सोमकुवर, राकेश कनोजिया ,दिपणकर गणवीर, अनुभव पाटील, यासिन भाई, प्रमोद खोब्रागडे,सलिम भाई, मुकेश कनोजिया, सुनील चहांदे, अविनाश भांगे,जोशेफ घरडे,प्रशांत नागदेवें आदी उपस्थित होते.