संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
-बावनकुळे च्या सभेवर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा सामूहिक बहिष्कार
कामठी ता प्र 10 :- नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचा निपटारा होत प्रशासनिक अडचणी दूर व्हाव्या या मुख्य उद्देशाने काल 9 नोव्हेंबर ला कामठी च्या एमटीडीसी सभागृहात माजी पालकमंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार टेकचंद सावरकर यांच्या मुख्य उपस्थितीत जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.या जनसंवाद सभेत उपस्थित समस्त नागरिकासमोर या जनसंवाद सभेशी कुठलाही संबंध नसलेल्या विषयावरून तालुका प्रमुख तहसीलदार यांच्या समोर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी समस्त तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा सार्वजनिक पाणउतारा करून अर्वाच्य भाषेचा वापर करून सार्वजनिक अपमान केला.कायदेसंगत नसतांनाही तलाठ्यांचे दफतर तपासणी करन्यासाठी तडकाफडकी रेकोर्ड बोलावून कारवाई करण्याची धमकी दिली.तसेच वारंवार बदली करण्याची धमकी दिली.याप्रसंगी महिला पटवारी सुदधा उपस्थित होत्या.आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा असला प्रकारचा अपमानास्पद व्यवहार मानसिक डोकेदुखी ठरल्याने उपस्थित तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी या सभेचा निषेध करीत भविष्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सर्व प्रकारच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून तसे सामूहिक निवेदन आज उपविभागीय शाखा मौदा कामठी च्या विदर्भ पटवारी संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारला सामूहिक निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तलाठी एस एम वड्डे, पी एस डंभारे,नितीन उमरेडकर, नरेंद्र घाटबांधे,जी बी उईके,एल बोडखे,एस फुले,व्ही डोळस,डी कापगते,जे तिजारे, डी मस्के,एस शिरभाते,तेजस धोडके, नितीन फुलझेले,पद्माकर , कैलास मेंढे,एम वकील,जयवर्धन महानाम,संजय कांबळे,कुंबरे आदी उपस्थित होते.