अमरावती :- ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात सामूहिक पंचप्रण कार्यक्रम संपन्न झाला. विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामगिरीची मानसिकता मुळापाासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू, देशाचे संरक्षण करणाया सैनिकांचा सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू, अशी शपथ घेण्यात आली.
यावेळी डॉ. श्रीकांत पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले, भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, खरेदीवेळी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये, आपल्या परिसरामध्ये वटवृक्षाचे रोपण करुन त्याचे संगोपन करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव जिस्कार यांनी तर, आभार प्रा. सुरेश पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत भगत, प्रा. मंजुषा बारबुधे, प्रा. अश्विनी राऊत, प्रा. राधिका खडके, प्रा. जुबेर खान, प्रा. विनय पदमवार, प्रा. मनोज वाहणे, प्रा. शुभांगी रवाळे, प्रा. स्वप्निल मोरे, प्रा. राम ओलीवकर, प्रा. संदीप महल्ले, प्रा. आदित्य पुंड, प्रा. शिल्पा देव्हारे, दिलीप अडसर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विभागातील विविध अभ्यासक्रमाचे समन्वयक, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.