तस्करी केलेले 7.85 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोकेन महसूल गुप्तचर विभागाने केले जप्त

मुंबई :- मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी (7 ऑगस्ट, 2023) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून( CSMI) अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून युगांडाच्या एका पुरुष प्रवाशाला अटक केली. या संदर्भात प्रवाशाकडे सविस्तर चौकशी केली असता, भारतात तस्करी करण्यासाठी आपण अमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आणि ते शरीरातून वाहून नेत असल्याचे कबूल केले. या प्रवाशाला नंतर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

785 ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण 65 कॅप्सूल, ज्याची किंमत 7.85 कोटी रुपये आहे,त्याच्या शरीरातून बाहेर काढण्यात आल्या आणि गुरुवारी (10 ऑगस्ट 2023) एनडीपीएस कायदा 1985 अन्वये जप्त करण्यात आल्या. या प्रवाशाला एनडीपीएस कायदा 1985 च्या कलमानुसार अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून भारतात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीमध्ये सहभाग असलेल्या या आंतरराष्ट्रीय टोळीच्या इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित

Sat Aug 12 , 2023
– अधिवेशनात 23 दिवसांच्या कालावधीत 17 बैठका – एकूण 21 विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी केली मंजूर – अधिवेशनात लोकसभेत सुमारे 44% आणि राज्यसभेत 63% कामकाज नवी दिल्ली :- 20 जुलै 2023 रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन, 2023 आज निश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात 23 दिवसांच्या कालावधीत 17 बैठका घेण्यात आल्या. या अधिवेशनात लोकसभेत 15 विधेयके तर राज्यसभेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!