मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महायुवा” ॲपचे अनावरण

मुंबई, दि. २५ :- शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्या दरम्यान दुवा ठरू शकेल अशा ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्य, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस तसेच सुरज चव्हाण, मिलिंद साटम आदी उपस्थित होते.

या ॲपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधर या ॲपवर आपले प्रोफाईल तयार करतील. त्यांच्याकडील विशेष प्राविण्य व आवडीचे क्षेत्र याबद्दलची माहिती अपलोड करेल. या आधारे त्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून महसूल अधिकाऱ्यांनी जलद सेवा द्याव्यात - निरंजन सुधांशू

Sat Mar 26 , 2022
दोन दिवसीय विभागीय महसूल परिषदेचे उद्घाटन महसूल विषयक कामकाजावर होणार मंथन नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होत आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितले. वनामती सभागृहात आयोजित महसूल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com