योगनृत्य परिवारातर्फे ओमनगर परिसराची स्वच्छता

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजीत स्वच्छता अभियान लीग स्पर्धेअंतर्गत योगनृत्य परिवारातर्फे भिवापूर वार्ड येथील ओमनगर परिसरात १ महीना स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर योगनृत्य परिवाराचे संस्थापक गोपाल मुंदडा, केंद्र प्रमुख कविता कुरेवार यांच्या सहकार्याने ४ नोव्हेंबर पासुन स्वच्छता कार्याला सुरवात करण्यात आली. परिवारातील महीला सदस्यांनी पावडे, घमेले यांच्या सहाय्याने नागमंदिर परिसर व योगनृत्य परिसर येथे साफसफाई तसेच वृक्षारोपण केले. परिसरातील झाडांनाही रंग देण्यात आला.

जनजागरण रॅली तसेच पथनाट्य सादरीकरण द्वारा आपल्या घराप्रमाणेच आजुबाजुचा परिसर स्वच्छ कसा ठेवावा यांची माहीती नागरिकांना देण्यात आली. ३० दिवस चाललेल्या या मोहीमेत नागरिकांनी स्वयंभु सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्व जाणले व प्रत्यक्षात आणले. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी वैशाली बावीस्कर, वंदना भागवत, नूतन सलामे, नेहला चिमुरकर, सिमरन खाडीलकर, सरिता दुर्गे, जयश्री नंदनवार,आशा बनकर, वैशाली पोहनकर,राजेश नागपुरे, दुर्गा नागपुरे तसेच संपुर्ण योगनृत्य परिवाराने परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासनाची लाड व पागे समितीच्या संरक्षणासाठी व त्याची अंमलबजावणी करिता राज्याचे उपमुख्यमंत्र्याची नेमणूक

Fri Dec 2 , 2022
मुंबई :- महाराष्ट्र शासनाने लाड व पागे समितीच्या सिफारिशच्या संरक्षण करण्यासाठी व पागे समिती शिफारसींची अमलबजावणी करिता उपमुख्यमंत्री सहकॅबिनेट मंत्री यांच्या समावेश करून समिती नेमली. या समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक करून विशेष पुढाकार घेतला व सफाई कामगारांप्रति आपली संवेदनशीलता दाखवून स्वतः होऊन समितीचे अध्यक्षपद स्वीकारले. याकरिता SBM विकास सेवा संस्था तर्फे संस्था चे अध्यक्ष सतीश सिरसवान यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com