कारगिल विजय दिनी “अमर जवान” स्मारकाची स्वच्छता

नागपूर :- भारतीय सैन्याच्या असीम शौर्याची आठवण जागृत ठेवणाऱ्या कारगिल विजय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या चमुद्वारे अमर जवान शहीद स्मारकाची व थोर हुतात्मा यांच्या पुतळयाला स्वच्छता करून समस्त हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासह शहराच्या सौंदर्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्य करीत आहे. 25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने अमर जवान शहीद स्मारकासह शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांची देखील स्वच्छता करण्यात आली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात आणि दहाही झोनचे सहायक आयुक्त यांच्या देखरेखीत शहरातील दहाही झोन मध्ये असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांस्थानी श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेदरम्यान नागरिकांनी देखील श्रमदान करीत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

KARGIL VIJAY DIWAS CELEBRATION BY ARMY POSTAL SERVICE WING  

Sat Jul 27 , 2024
Mumbai :- On the eve of Kargil Vijay Diwas, 2024, Army Postal Service Wing, Brigade of The Guards Regimental Centre spread their wings over Bina Village in a spirit of goodwill and camaraderie that the Indian Army symbolizes. Cleanliness drive, tree plantation, up gradation of school infra, distribution of sweets and motivational lectures among other initiatives brought smiles to the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com