सोमवारी होणार शहरातील 59 पुतळ्यांची व चौकांची स्वच्छता

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाच्या माध्यमातून सोमवार 28 ऑक्टोबर 2024 रोजी शहरातील पुतळ्यांची व चौकांची स्वच्छता सकाळी ७ वाजता पासून केली जाणार आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेद्वारा ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत सोमवारी ( ता:28)दहाही झोनमधील महापुरूष, स्वातंत्र्य सेनानींच्या एकूण ५९ पुतळ्यांची व चौकांची स्वच्छता करण्यात येणार आहे.

या सफाई अभियानामध्ये संबंधित झोनमधील नागरिकांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Real CBI Mumbai officials & SPRF personnel tries duping firm 

Sun Oct 27 , 2024
– SRPF personal arrested The Pimpri Chinchwad Police on Friday evening arrested a State Reserve Police Force(SRPF) head constable who posed as a CBI official and demanded Rs 12Lacs from a firm dealing with Petroleum storage Design, Engineering & Service activities on NDA-Paschan Road. The Head constable Named Vinod Thorwat(39 yrs) posing himself as an CBI officer was posted at […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com