नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक नागपूर जिल्ह्यामध्ये घेण्याकरीता प्रस्तावित मतदान केंद्राची यादी दिनांक 31 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगर पालिका कार्यालय, नागपूर जिल्हा परीषद कार्यालय तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पालिका कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसिल कार्यालयामध्ये याठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.
मतदान केंद्राच्या यादीवर ज्यांना दावे व हरकती सादर करावयाचे असतील त्यांनी आपले दावे व हरकती लेखी स्वरुपात मतदान केंद्राच्या यादी प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसाचे आत म्हणजेच दिनांक 7 जानेवारी, 2023 च्यापूर्वी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षीक निवडणूक, 2022 अंतर्गत नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 29 डिसेंबर, 2022 रोजी जाहीर केला आहे. सदर कार्यक्रम जाहीर झाल्यापासून तत्काळ प्रभावाने जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.
@ फाईल फोटो