सीटू चा ५५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

– प्रविण्य मिळवलेल्या आशा वर्करांच्या मुलांचा केला सत्कार

– आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन(सीआयटीयू)

नागपूर :- भंडारा तर्फे गुरुदेव सेवाश्रम येथे सी आय टी यु संघटनेचा ५५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पाहुण म्हणून महानगरपालिकेचे अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ.राजेंद्र साठे यांनी सिटू स्थापनेची गरज का भासली व त्याचे महत्त्व काय ? यावर आपल्या प्रस्तावनेमध्ये माहिती दिली.अल्प मोबदल्यामध्ये आरोग्य विभागाचे भक्कम काम करणाऱ्या आशा वर्कर हलाखीची परिस्थिती असून सुद्धा त्यांच्या मुलांनी दहावी व बारावी मध्ये उत्तम गुण मिळवून प्राविण्य मिळवल्यामुळे संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचा व पालकांचा प्रमाण पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कित्येक आशा वर्कर यांनी सुद्धा दहावी बारावीची परीक्षा देऊन उत्तम प्रकारे प्राविण्य मिळवलं. परीक्षेच्या दरम्यान आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे २२ मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनात हिस्सेदारी असल्यानंतर सुद्धा मुलांच्या परीक्षेमध्ये कोणते विघ्न पडू दिले नाही.

विद्यार्थ्यांमध्ये ९३.८३ टक्के गुण मिळवून १२ वी मध्ये वंशिका प्रवीण मस्के हिच्या प्रथम क्रमांक आला. ९३ टक्के गुण मिळवून दीक्षा राजू माटे हिचा दुसरा क्रमांक आला. ९१.२० ओके गुण मिळवून जीत राकेश शेंडे यांचा तिसरा क्रमांक आला. अशाप्रकारे आशा वर्कर व त्यांच्या मुलांना मिळून ९६ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नागपूर जिल्हा महासचिव कॉ. प्रीती मेश्राम यांनी कामाच्या बाबतीत योग्य मोबदला मिळवून घेण्याकरता देशात एकमेव सिटी संघटना कर्मचाऱ्यांच्या हिताचे काम करते असे त्यांनी सांगितले. भंडारा जिल्हा महासचिव कॉ. उषा मेश्राम यांनी राज्यस्तरावर असणारे नेते कामगारांच्या हितासाठी कशाप्रकारे पाठपुरावा करतात. असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाला राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, उषा मेश्राम, रंजना पौनिकर, माया कावळे, लक्ष्मी कोत्तेजवार, अर्चना कोल्हे, आरती चांभारे सह शेकडो आशा वर्कर व विद्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बोगस कृषि निविष्ठा निदर्शनास आल्यास तक्रार नोंदवा

Fri May 31 , 2024
Ø तक्रारींसाठी कृषी विभागाकडून क्रमांक जाहीर Ø अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहनhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 यवतमाळ :- खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशकाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. सदर कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. दर्जाबाबत किंवा बोगस निविष्ठांबाबत शेतकऱ्यांना तक्रार असल्यास त्यांनी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्तम दर्जाच्या उपलब्धता व्हाव्यात तसेच जिल्ह्यात कोठेही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com