नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने 5 सप्टेंबर 2016 च्या सर्वसमावेशक सूचनेनुसार शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. 1 नोव्हेंबर2022 या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार यांद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केले आहे, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी कळविले आहे.
1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द होईल. 15 ऑक्टोबर रोजी मतदार नोदणी अधिनियमान्वये नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार. 25 ऑक्टोबर रोजी द्वितीय पुर्नप्रसिध्दी करण्यात येणार. 7 नोव्हेंबर रोजी नमुना 18 व 19 द्वारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिवस. 19 नोव्हेंबर रोजी हस्तलिखित तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई. 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी आणि दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर असेल. 25 डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येईल. 30 डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येईल.
कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये सुधारणा केल्या आहेत. तद्नुषंगाने नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या नव्याने तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्जाचा नमूना 19 यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध नमून्याच्या छपाईचे काम सुरुआहे. नमूना 19 मध्ये आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करुन देण्यात आलेला असून अर्ज विहित कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदाराच्या वतीने ऐच्छिक आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमानूसार नागपूर विभाग शिक्षक मतदार यादीमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यास पात्र शिक्षक मतदार, शिक्षक संघटना, राजकीय पक्षांनी 1 ऑक्टोबर पासून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नावे नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरु होत असल्याबाबत नोंद घ्यावी. विहित कालावधीत मतदार यादीत आवश्यक कागदपत्रासह नमूना 19 सादर करुन मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com