संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी नगर परिषद च्या नर्सरीची मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केली पाहणी
कामठी :- कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सह समनव्यक अमोल कारवटकर यांच्या अथक प्रयत्नाने नगर परिषद कार्यालय परिसरात नगर परिषद ची स्वतःची नर्सरी तयार करण्यात आली आहे. या नर्सरीत 56 प्रकारच्या रोपट्यांचा समावेश आहे.कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजन चा तुडवडा लक्षात घेता भविष्यात वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी न होवो यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करण्यावर भर द्यावा असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी नर्सरीची पाहणी करतेवेळी केले.
याप्रसंगी भन्ते नागदीपंकर, दर्शन गोंडाने ,लेखापाल अमित खंडेलवाल, स्वास्थ्य निरीक्षक विनोद मेहरोलिया, समन्वयक अमोल कारवटकर आदींनी नर्सरीची पाहणी केली. दरम्यान मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यास व प्रदूषण कमी करण्यास झाडांचे किती मोलाचे सहकार्य आहे याबाबत मौलिक अशी माहिती दिली.नागरिकांनी सुदधा आपल्या घरी कमीत कमी 50 रोपट्यांची नर्सरी तयार करावी व त्याचे संगोपन करावे .कोरोना काळात ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे महत्व किती आहे हे आपणास समजते याकरिता नैसर्गिकरित्या ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या झाडांचे खूप महत्व आहे.या अनुषंगाने शासनामार्फत वृक्ष लागवडी बाबत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत परंतु वृक्ष लागवडी बरोबरच त्याचे संगोपन ही खूप महत्त्वाची बाब आहे.त्यानुसार कामठी शहरातील प्रत्येक कुटुंबाने किमान 50 रोपटे तयार करावेत व येत्या पावसाळ्यात त्याची योग्य ठिकाणी लागवड करून संगोपन करावे जेणेकरून वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणार नाही व पृथ्वीची उष्णता सुदधा आटोक्यात राहील .