संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी शहरात अतिक्रमण कारवाहिला आला वेग..
कामठी ता प्र 14:- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र 44 वरील नागपूर कामठी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण बाहेर काढून प्रस्तावित योजना यशस्वी करणे अभिप्रेत असून या मार्गाने जाणाऱ्या मेट्रो उडानपूल आदी विकासकामे प्रस्तावित आहे त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढणे अति आवश्यक असल्याने नागरीकानी प्रशासनाने कारवाही करण्याआधीच अतिक्रमित जागा मोकळी करावी व कामठी शहराच्या विकासासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाहीला नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान वाहतुक पोलीस विभाग कामठी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र तायडे यांनी आज कामठी शहरातील अतिक्रमण कारवाही प्रसंगी व्यक्त केले. नागपूर जबलपूर महामार्गावर असलेल्या कामठी शहरातील महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून अस्तव्यस्त वाहतुकीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाती घटना होउन जीवितहानीस निमंत्रण मिळत आहे.तसेच रस्त्याच्या मधोमध मेट्रो पुलाचे बांधकाम प्रस्तावित होणार असून लवकरच बांधकामाचा शुभारंभ होणार आहे.तेव्हा या महामार्गाच्या कडेला असलेला भाग हा आतिक्रमणमुक्त व्हावा यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाने दिलेल्या आदेशानव्ये आज सकाळपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, कामठी वाहतूक पोलीस विभाग तसेच कामठी नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली.या अतिक्रमण कारवाहीत गरुड चौक ,नवीन कामठी पोलीस स्टेशन समोरून ते कमसरी बाजार चौक पर्यंत शेकडो च्या वर अतिक्रमन काढण्यात आले.या अतिक्रमण कारवाहीत वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र तायडे , सह वाहतूक पोलीस पथक, कामठी नगर परिषद चे अधिकारी मंगेश लाडे, विक्रम चव्हाण यासह कर्मचारी पथक सह अतिक्रमण कारवाही पथक उपस्थित होते
कामठी शहराच्या विकासासाठी नागरीकानी अतिक्रमण कारवाहिस सहकार्य करावे-एपीआय नरेंद्र तायडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com