संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.त्यामुळे घामाघूम झालेले नागरिक मजूर,शेतमजूर,दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेऊन विश्रांती करीत आहेत तसेच रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
उष्णतेमुळे चिमुकली बालके,रुग्ण, सामान्य नागरिक, वयोवृद्ध नागरिक हैराण झाले आहेत.उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.भर दुपारी 1 ते चार वाजेदरम्यान शहरातील वाहतूक मंदावत आहे.
नागरील उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी मोटर सायकलस्वार डोक्यावर हेल्मेट,स्कार्फ,रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत.काही कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक उन्हाचा चटका सहन केल्या नंतर रासवंतीगृह,शितपेयाची ठिकाणे गर्दी करीत असतात तर दुपारच्या वेळी निरर्थक घराबाहेर पडू नये असा ईशारा आरोग्य विभागाकडून दिला आहे.