नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडवा – कुणाल राऊत

मनपा आयुक्तांना निवेदन सादर
नागपूर :- शहरांतील काही भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रशासकीय यंत्रणांकडून रहिवाशांना रोजच्या वापरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी मनपा आयुक्तांशी भेट घेवून नागरिकांचे प्रश्न मांडले.
मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, सुरुवातीची पंधरा मिनिटे गाळ व मैलामिश्रीत येणारे पाणी, ड्रेनजची लाइन व पाणी पुरवठा करणारी लाइन हे एकाच ठिकाणावरून गेल्याने थोडा पाऊस पडला किंवा रोडवर पाणी आले की घाण पाणी येणार याची खात्री, ऐन उन्हाळ्यात टँकरने केलेला अपूरा पाणीपुरवठा अशा समस्यांचा सामना समता नगर, कल्पना नगर, विश्राम नगर, सुगत नगर, कबीर नगर, अंगूलीमाल नगर येथील नागरिकांना करावा लागत आहे.
आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव व नगरसेविका नेहा निकोसे यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी मनपा येथील आयुक्त कार्यालयात धडक दिली.
या प्रंसगी कुणाल राऊत यांनी आयुक्तांना भेटून नागरिकांचे प्रश्न मांडले. यावर आयुक्तांनी सकारात्मक चर्चा शिष्टमंडळाशी केली. यावेळी पानी पुरवठा करणारे टँकर चालक पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
निलेश खोब्रागड़े, बाबू खान, राकेश निकोसे, गौतम अंबादे, संतोष खडसे, सतीश पाली, सोनू खोब्रागड़े, तेजस्विनी सहारे, किरण धमेलिया, मयुरी टोपले, पोर्णिमा मरकाम, लक्ष्मी गणवीर, शालिनी उचितकर, संगीता कडमधार, माया गेडाम, प्राची करवडे, अशलेशा टेंभुर्णे, रंजना बोरकर, अर्जुंदा नंदेश्वर यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

MoU BETWEEN STN HQ PULGAON AND AVBRH SUPER SPECIALITY HOSPITAL, WARDHA

Mon Apr 4 , 2022
Wardha – An MoU was signed between Stn HQ Pulgaon and AVBRH Super speciality Hospital, Wardha to provide in situ medical facilities and health education sessions to all pers of Pulgaon Mil Stn as well as to conduct health camps in the villages / Town surrounding the Mil Stn. The AVBRH will provide medical specialists to conduct free OPD in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com