चित्ररथांव्दारे होणार ओमायक्रॉन विषयक जनजागृती

-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ

भंडारा, दि. 5 :  जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता कोरोना व ओमायक्रॉनविषयी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे सातही तालुकयातील गावागावात चित्ररथाव्दारे प्रचार-प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, उपजिल्हाधिकारी अर्चना यादव यांच्याहस्ते या चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी विदर्भ सिंचन महामंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन सातत्याने कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोना कमी झाला असे समजून मास्क न वापरण्याची सवय नागरिकांमध्ये वाढली आहे. हे घातक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी कोरोनाशी लढण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी या चित्ररथाव्दारे जागृती करण्यात यावी.

भंडाऱ्याच्या स्थानिक भाषेतुन जनजागृती…

अजी..तोंडाले मास्क लावा न जी… यासारख्या बोलीभाषेतुन या चित्ररथांव्दारे जागृती करण्यात येणार आहे. बोलीभाषेतुन सामान्य माणसांच्या अधिक जवळ जाता येत असल्याने हा प्रयोग पहिल्यादांच करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बॅकवॉटरमुळे नुकसान होत असलेल्या जमीन व पिकांची नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Wed Jan 5 , 2022
भंडारा, दि. 5 : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे अधिग्रहीत न केलेल्या मात्र सध्या नुकसान होत असलेल्या जमीनीचे व पिकांचे नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सार्वजनिक व वैयक्तीक मालमत्तांचे नुकसान होत असलेल्या बाबींना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. संदीप कदम बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) अर्चना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com